लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण फ्रेंच फ्राइज अगदी आवडीने खातात.
बाहेरच्या फ्रेंच फ्राइजमध्ये खराब तेलाचा वापर केला जातो. जे आरोग्याला नुकसान पोहचवू शकतं. म्हणून आज आम्ही घरच्या घरी फ्रेंच फ्राइज बनवण्याच्या टीप्स सांगणार आहोत.
घरच्या घरीच अशा पद्धतीने फ्रेंच फ्राइज बनवल्याने आरोग्यासाठी सुद्धा ते फायदेशीर ठरेल.
फ्रेंच फ्राइज बनवण्यासाठी 2- 3 मोठे बटाटे, मीठ, काळी मिरी पावडर, लाल तिखट, मैदा, कॉर्न फ्लोअर आणि तेल या साहित्यांची आवश्यकता लागेल.
सर्वप्रथम बटाटे सोलून घेऊन ते लांब आणि पातळ तुकड्यांमध्ये चिरुन घ्या. आता चिरलेल्या बटाट्यांना 10 मिनिटे थंड पाण्यात भिजवून ठेवा.
यामुळे बटाट्यांमधील स्टार्च निघून जाईल आणि फ्रेंच फ्राइज कुरकुरीत होण्यात मदत होईल. 10 मिनिटांनंतर बटाट्यांमधील पाणी काढून बटाटे कोरडे करुन घ्या.
एका बाउलमध्ये मैदा, कॉर्न फ्लोअर, मीठ, काळी मिरी पावडर आणि लाल तिखट चांगल्याप्रकारे मिसळून घ्या. यामध्ये बटाट्यांचे तुकडे घालून व्यवस्थित मिक्स करा.
एका कडईमध्ये तेल गरम करुन घ्या. बटाट्यांचे तुकडे सोनेरी रंगांचे होईपर्यंत तेलात तळून घ्या. तळलेले फ्रेंच फ्राइज पेपर नॅपकिनवर काढून घ्या.
आता गरमा गरम फ्रेंच फ्राइजना टोमॅटो केचअप किंवा आपल्या आवडत्या चटणीसोबत सर्व्ह करा.