रवीना तंडनची लेक राशा थडानीने नुकत्याच एक चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
राशा थडानी फक्त करिअरमध्येच नाही तर खासगी आयुष्यातसुद्धा प्रगती करत आहे.
तिने इतर टीनेजर्ससारखी रिलेशनशिप वगैरेमध्ये प्रगती केली नसून वयाच्या 19 व्या वर्षी 12 ज्योर्तिलिंगांचे दर्शन केले.
ज्योर्तिलिंगांच्या दर्शनासाठी राशा आई रवीना सोबत गेली होती.
काही दिवसांपूर्वीच ती नागेश्वर आणि द्वारिकेत पूजा-अर्चा करताना दिसली.
हे देवदर्शनाचे फोटो राशाने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
देवदर्शनाच्या फोटोंवर राशाने 'खूप छान अनुभव आहे' असं कॅप्शनमध्ये लिहिले..