Swapnil Ghangale
Jul 07,2023

पोटाला हलक्या पदार्थांना प्राधान्य द्या

सामान्यपणे ऋतुमानानुसार आहार असावा असं सांगितलं जातं. त्यामुळेच पावसाळ्यामध्ये पोटाला हलक्या असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्यावं आणि मांसाहार टाळावा.

प्रजननाचा काळ

पावसाळ्यामध्ये मासळीचं सेवन करताना अधिक काळजी घेतली पाहिजे. मुळात पावसाळ्याचा काळ हा माशांच्या प्रजननाचा काळ असतो.

समतोल राखण्यासाठी मासेमारी बंद

पावसाळ्याच्या काळामध्येच मासे, कोळंबीचे प्रजनन होते. त्यामुळेच निर्सगाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने या काळामध्ये अनेक ठिकाणी मासेमारीही बंद असते.

मासळी टाळण्याचं मुख्य कारण म्हणजे...

मासळी किंवा कोळंबी पावसाळ्यामध्ये टाळण्यामागील आणखीन एक मुख्य कारण म्हणजे याच काळात पाण्याच्या माध्यमातून लोकांना वेगवेगळ्यापद्धतीचं इन्फेक्शन होतं.

मांसाहार करताना काळजी घ्या

तसेच पावसाळ्यामध्ये मानवाची पचनसंस्था ही संथ गतीने काम करते. त्यामुळेच मांसाहार करताना काळजी घ्यावी.

मासळी खाणं टाळावं

डॉक्टरांच्या माहितीनुसार, पावसाळ्यामध्ये मांसाहार आणि खास करुन मासळी खाणं टाळावं.

मासळी हाच आहाराचा मुख्य भाग

मात्र अनेक आशिया देशांमध्ये मासळी हाच आहाराचा मुख्य भाग असतो. म्हणूनच अनेकजण कोणताही ऋतू असला तरी मासळीचं सेवन करतात.

मासळीचं सेवन नकोच

असं असलं तरी पावसाळ्यामध्ये शक्य तितक्या प्रमाणात मासळीचं सेवन टाळावं असा सल्ला डॉक्टर देतात.

कोळंबीपासून दूर राहणाचं फायद्याचं

त्यामुळेच कोळंबी खाण्याचा कितीही मोह झाला तरी पावसाळ्यामध्ये कोळंबीपासून दूर राहणाचं फायद्याचं ठरु शकतं.

ही सामान्य माहिती

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story