संध्याकाळी लहान मुलांना सतत भूक लागत असते. अशावेळी त्यांना बाहेरचं काही खायला देण्यासाठी घरातच असलेल्या सामानापासून तुम्ही चटपटीत रेसिपी करु शकता.
मेघना कडू या फूड ब्लॉगरने शेअर केलेली पोह्यांपासून पौष्टिक कुरकुरे बनवू शकता. याची सोपी रेसिपी नोट करुन ठेवा.
एक कप पोहे, बेसन, पाणी, मीठ, मक्याचे पीठ, तेल, लाल तिखट, चाट मसाला
सर्वप्रथम पोहे मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडक तयार करुन घ्या. त्यानंतर यात बेसनाचे पीठ मिक्स करुन एक मिश्रण करुन घ्या.
त्यानंतर पॅनमध्ये गरम पाणी करत ठेवा त्यात थोडे मीठ देखील मिक्स करा. पाणी थोडे गरम झाल्यानंतर त्यात वरील मिश्रण एकजीव टाकून नीट एकजीव करुन घ्यावे.
कुरकुरेचे पीठ तयार झाल्यानंतर त्यात मक्याचे पीठ आणि एक चमचा तेल मिक्स करुन व्यवस्थित मळून घ्यावे. त्यानंतर त्याला कुरकुरेसारखा आकार द्यावाय
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा आणि कुरकुरे हलक्या सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.
कुरकुरे तळून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ टाकून मिक्स करा. आता पौष्टिक कुरकुरे तयार झाले आहेत.