हिंग

मासिक पाळीमध्ये पोटदुखी आणि इतर शारीरिक समस्यांसा टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हिंगाचे सेवन हा एक प्रभावी उपाय आहे. हा एक आयुर्वेदिक उपाय आहे, जो तुमच्या पेल्विक स्नायूंना बळकट करण्यास मदत करते व त्यांची लवचिकता वाढवते ज्यामुळे मासिक पाळीत वेदना कमी होण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.) (All Photo : File Photo)

May 05,2023

भरपुर पाणी प्या

खूप पाणी पिल्यास शरीर हायड्रेट राहते. पोट फुगण्यापासून आराम हवा असेल सोपा उपाय म्हणजे अधिकाधिक पाण्याचे सेवन

मनुका आणि केसर

दोन लहान वाट्यांमध्ये 4 किंवा 5 काळे मनुके आणि दुसऱ्या वाटीमध्ये 1-2 केशर ठेवा. सकाळी उठल्यावर त्याचे सेवन करा. पीरियड क्रॅम्प्स आणि ब्लोटिंगच्या हा एक उत्तम उपाय आहे.

मेथी दाणे

मेथी दाणे मासिक पाळीचे दिवस आरामदायी जाण्यासाठी मदतशीर ठरू शकतात. त्यासाठी 12 तास मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ठेवा, त्यानंतर त्यातले पाणी गाळून त्याचे सेवन करा.

हिरव्या भाज्या

दैनंदिन आहारात केळी, हिरव्या पालेभाज्या आणि पालकाचे प्रमाण वाढवा. यात भरपूर जीवनसत्त्वे असतात.

अशा परिस्थितीत काय करावे

मासिक पाळी दरम्यान स्त्रियांन ओटीपोटात तीव्र वेदना होतात. अशा परिस्थितीत काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. किचनमधल्या वस्तूपासूनचे उपाय जाणून घेऊयात आहोत.

पेनकिलरचा वापर

मासिक पाळीत स्त्रियांना अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु ओटीपोटात तीव्र वेदनांपासून आराम मिळण्यासाठी महिला पेनकिलर किंवा काही इतर औषधांचा वापर करतात. ज्यामुळे भविष्यात त्यांना शारीरिक वेदना होऊ शकतात. त्यामुळे पेनकिलरचा वापर टाळावा.

VIEW ALL

Read Next Story