चहा किंवा कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती ?


चहाला वेळ नसली तरी वेळेला चहा हा पाहिजेच असतो. असं बऱ्याचदा चहाप्रेंमींकडून सांगितलं जातं.


सकाळी उठल्यावर, कामाच्या ठिकणी आणि संध्याकाळी अनेकांना चहा आणि कॉफीची तलफ येते.


दिवसातून तीन ते चार कप कॉफी आणि चहा घेतली जाते. त्यामुळे याचा गंभीर परिणाम आरोग्यावर होतो.


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चहा आणि कॉफी एका ठराविक वेळेतच घेणं फायदेशीर आहे.


उत्साहवर्धक असल्याने सकाळी चहा आणि कॉफी सेवन केल्यास ताजेतवाने वाटते.


असं म्हटलं जातं की, सकाळ आणि संध्याकाळी चहा आणि कॉफी पिण्याची योग्य वेळ आहे.


सकाळी उठल्यावर उपाशी पोटी चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते.


सकाळी नाश्ता केल्यानंतर एका तासाने चहा पिणं फायदेशीर आहे.


दुपारच्या जेवणानंतर किमान दीड ते दोन तासाने चहा आणि कॉफी पीणं फायदेशीर मानलं जातं.


याऊलट रात्राी झोपण्यापूर्वी चहा कॉफीचं सेवन केल्याने याचा झोपेवर गंभीर परिणाम होतो.

VIEW ALL

Read Next Story