अंड्यात उष्णतायुक्त प्रथिने जास्त असल्याने उन्हाळ्यात जास्त अंडी खाल्ल्यास शरीरातील उष्णता आणखी वाढते. पोटाचे आजार, अपचन, अशा अनेक समस्यासुद्धा निर्माण होतात.
मेडिसर्कलमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, अंड्यांमध्ये साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया आढळतो. जो कोंबडीपासून अंड्यात येतो. आपण अंडी नीट उकडली नाहीत तर हे बॅक्टेरिया तुमच्या शरीरात जातो.
योग्य प्रकारे शिजवलेले अंडी खाणे फायदेशीर आहे. कच्ची अंडी खाणं चुकीचं असून त्यामुळे पोटात सूज येणे, उलट्या होणे आणि पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने आरोग्यावर इतरही अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने अंडी जास्त प्रमाणात खाल्ल्याने किडनीवर विपरीत परिणाम होतो.
काही लोकांना अंड्याची ॲलर्जी असते, अशा लोकांनी अंडी खाणे सरळ टाळावे.
रोज 1-2 अंडी खाण्यात काही नुकसान नाही, पण उन्हाळ्यात दिवसा एकच अंडे खाण्याचा प्रयत्न करा.
तुम्ही अंड्यांसोबत काय खात आहात, या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा, चुकीचे फूड कॉम्बिनेशन आरोग्याला हानीकारक ठरू शकते.
अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉल देखील असते, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांनी अंडी दररोज खाऊ नयेत. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका वाढू शकतो.
अनेकजण कच्चं अंडं दुधात टाकून पितात. त्यांना वाटतं की अंडं शिजवलं की त्यातली प्रथिनं कमी होतात. पण हे खरं नाही. उलट अंडं नेहमीच शिजवून खावं. त्यामुळे त्यातला साल्मोनेला विषाणू नष्ट होतो.
अनेकांना वाटतं की आपण जे अंडं खातो त्यात कोंबडीचं पिल्लू असतं. पण असं नाही. अंडी कोंबडीने उबवली तरच ती फलित होऊन त्यात पिल्लू तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते.