आपल्यापैकी अनेकजणांना चहा पिण्याची फार आवड असते. काहींना तर कधीही आणि कितीही प्रमाणात चहा पिण्याची सवय असते. घरात येणाऱ्या पाहुण्यांना देखील पहिल्यांदा चहाच विचारला जातो. परंतु, रिकाम्या पोटी जास्त चहा पिणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचंही आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
काही लोकांना चहा पिण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असते. तर आता प्रश्न असा की, चहा किंवा कॉफी पिण्याआधी पाणी पिणं योग्य आहे का?
चहा आणि कॉफी पोटात गेल्यावरच आम्ल तयार करतं. चहाचं पीएच मूल्य 6 असते तर कॉफीचे पीएच मूल्य 5 असतं अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही चहा किंवा कॉफी पितात तेव्हा शरीरात अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो. चहा किंवा कॉफी पिण्यापूर्वी पाणी प्यायल्यास आजारांचा धोका काही प्रमाणात कमी होतो.
चहा-कॉफीपूर्वी पाणी प्यायल्याने आतड्यात एक थर तयार होतो जो कॅफेनमुळे होणाऱ्या हानीपासून संरक्षण करतो.
दात न घासता किंवा रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे. यामुळे पोटात अॅसिड तयार करण्याचं काम करतं. यामुळे दातंही खराब होतात.
चहा पिण्याच्या 10 -15 मिनिटे आधी पाणी प्यावे. जेणेकरून शरीरात तयार होणारे आम्ल घटक कमी होतात.
चहा प्यायल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे अत्यंत हानिकारक आहे. त्यापेक्षा चहा पिण्याच्या 10 -15 मिनिटे आधी पाणी पिणं योग्य आहे.