2024 च नाही तर 2025 मध्येही 'या' राशींवर राहणार शनीदेवाची कृपा

Jan 27,2024

ज्योतीषशास्त्रात शनीदेवाला न्यायदेवता म्हणूनही ओळखलं जातं. कारण शनीदेव प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ देत असतो.

यावर्षी 2024 मध्ये शनीदेव जवळपास 3 वेळा आपला मार्ग बदलणार आहे. जे फार महत्त्वपूर्ण मानलं जात आहे.

यावेळी शनीची साडेसाती मकर, कुंभ आणि मीन राशीवर आहे. तिचा कर्क आणि वृश्चिक ढैय्या चालू आहे.

कुंभ राशीत उदय आणि अस्त

शनी 29 जून 2025 ला कुंभ राशीतून बाहेर पडत मीन राशीत प्रवेश कऱणार आहे. 11 जानेवारी 2024 मध्ये शनी कुंभ राशीत अस्त होणार आहे. यानंतर 18 मार्चला उदय आणि 29 जून शनी वक्र होईल.

शनीच्या बदलणाऱ्या या मार्गांमुळे 2025 पर्यंत कोणत्या राशींवर पैशांची बरसात होणार आहे हे जाणून घ्या.

मेष

या राशीवर 2025 पर्यंत शनीची कृपा असणार आहे. शनीच्या कृपेने त्यांना आर्थिक लाभ होईल. उद्योग आणि करिअरमध्ये यश मिळेल. एखादी आनंदाची बातमीही मिळू शकते.

सिंह

सिंह राशीच्या लोकांवर 2025 पर्यंत आर्थिक प्रगतीचा योग आहे. वैवाहिक आयुष्यासंबंधी आनंदाची बातमी मिळेल. यश तुमच्या पायाशी असेल.

तूळ

2025 पर्यंत अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होतील. व्यापारात वेगाने विकास होईल. पैसा कमावण्याने आणि बचत केल्यानेही लाभ मिळेल.

मकर

2025 पर्यंत तणावमुक्त व्हाल. फक्त शत्रूंपासून सावध राहण्याची गरज आहे. आपल्या वाणीने दुसऱ्यांचं मन जिंकाल. करिअरमध्ये नव्या संधी मिळतील.

VIEW ALL

Read Next Story