काजू हा आरोग्यासाठी उत्तम खुराक मानला जातो. मात्र, काजू आरोग्यासाठी हानीकारक देखील ठरु शकतात.
काजू खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच ते शरीरासाठी नुकसानदायक देखील आहे.
काजू शरीरातील पाणी शोषून घेतात. जास्त प्रमाणात काजू खाल्ल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.
काजूमध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्याने लठ्ठपणा येवू शकतो.
मधुमेह आणि थायरॉईडच्या रुग्णांनी काजू खाणे टाळावे.
काजूमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जास्त असल्याने किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी काजू खाऊ नयेत.
दम्याचा त्रास असणाऱ्यांनी काजूचे सेवन कटाक्षाने टाळावे.