डायबेटीस नियंत्रणात राहतं

काळ्या मनुकातील Pterostilbene हा घटक डायबेटीसमध्ये उपयुक्त ठरतो. यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते. (Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)

May 22,2023

हिमोग्लोबिन वाढतं

काळ्या मनुक्यात लोह आणि इतर जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित ठेवते

काळ्या मनुकात पोटॅशियम आणि GLA चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज काळ्या मनुका खाण्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.

हृदयविकाराचा धोका कमी करते

काळ्या मनुकात हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. पोटॅशियम हृदयाला बळ देते आणि हृदय विकारांचे प्रमाण कमी करते.

केसगळती थांबेल

तुमचे केस गळत असेल तर तुम्ही नियमितपणे मनुकांचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा मिळतो. मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह असतं त्यामुळे केस घनदाट होण्यास मदत होते.

दातांची समस्या दूर होईल

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधीचा त्रास होत असेल तर भिजवलेले मनुके खाल्ल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. भिजवलेले मनुके खाल्ल्यास तोंडातील असलेले बॅक्टेरिया हळूहळू कमी होतात.

चेहऱ्यावर ग्लो येतो

भिजवलेले मनुका खाल्ल्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो आणि पिंपलपासून सुटका मिळतो.

वजन कमी होणार

जर तुमची पचनक्रिया बरोबर असेल तर भिजवलेले मुनके खाल्ल्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. ग्लुकोज आणि फ्रक्टोजमुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी होण्याची प्रक्रिया हळूहळू असते पण भिजवलेले मुनके खाल्ल्यात फायदा होतो.

पोट स्वच्छ होतं

अपचन किंवा पोटदुखीची समस्या असेल तर भिजवलेले मनुके खाल्ल्यास तुम्हाला फायदा होईल. मनुकामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स आहेत. त्यामुळे तुमची पचनशक्ती मजबूत होते आणि गॅसची समस्या दूर होते.

उपाशी पोटी काळे मनुके खाण्याचे फायदे

काळे मनुके उपाशी पोटी खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे काळे मनुके नियमित खाल्ल्याने हृदय विकारापासून मुक्तता मिळवता येते.

VIEW ALL

Read Next Story