थंडीत ओठ फाटतायत ? करा 'हे' घरगुती ऊपाय...

Nov 25,2023


थंडीच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. असं न केल्यास त्वचेसंबंधी अनेक तक्रारी दिसून येतात.


थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी होणं ही खूप सामान्य गोष्ट आहे. अश्या अनेक समस्या कमी करण्यासाठी काय करावं याबद्दल आज जाणून घेऊ.


थंडीच्या दिवसात अंघोळी अगोदर त्वचेला मोईस्चराइज केल्यानं आयुर्वेदानुसार हात आणि ओठ फाटण्याची समस्या कमी होऊ शकते.


त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी थंडीच्या दिवसात अंघोळ करायच्या अगोदर त्वचेवर तेल लावू शकता.


त्वचेवर तेल लावल्याने त्वचा कोरडी होत नाही. तेल लावल्यानंतर काही वेळाने अंघोळ करून स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.


त्वचेवर नारळाचं तेल किंवा दुसरं तेल लावू शकता.


अंघोळी अगोदर तेलाने मालिश केल्यान मांसपेशींना आराम मिळतो तसंच रक्ताभिसरण चांगले होते.


मध हे आयुर्वेदात खूप गुणकारी आहे. ओठांच्या समस्या असतील तर मध ओठांवर लावल्यानं थंडीत ओठ फाटणार नाहीत.

VIEW ALL

Read Next Story