रोजच्या जीवनातील 'या' सवयी देऊ शकतात कॅन्सरला आमंत्रण! करा हे बदल

Feb 11,2025


अनेकांना आपल्या काही वाईट सवयींचे दुष्परिणाम माहित असूनही त्याकडे ते दुर्लक्ष करतात. मात्र, या सवयी कॅन्सरसारख्या आजाराला कारणीभूत ठरु शकतात.

धुम्रपान

धुम्रपान हे कॅन्सरला आमंत्रण देणारे व्यसन ठरते. धुम्रपान सोडल्याने फुफ्फुसे, घसा आणि तोंडाचा कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो.

अधिक सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाशात जास्त काळ थांबल्याने देखील कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो. यासाठी सनस्क्रिन तसेच, सूर्यप्रकाशापासून बचाव करणारे कपडे परिधान करणे गरजेचे आहे.

असंतुलित आहार

आहारतील प्रक्रिया केलेले धान्य तसेच मांस आणि साखरयुक्त ड्रींक्ससुद्धा कॅन्सरचा धोका वाढण्याला कारणीभूत ठरु शकतात. यासाठी संतुलित आणि सात्विक आहार घेण्याचा प्रयत्न करा.

शारीरिक हालचाली

आधुनिक जीवनशैलीमुळे व्यक्तीच्या शारीरिक हालचाली कमी होत आहेत. यामुळे स्तन तसेच गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो.

जास्त प्रमाणात मद्याचे सेवन

अतिप्रमाणात मद्य किंवा अल्कोहोलचे सेवन केल्याने स्तन आणि लिव्हर कॅन्सरसारखा गंभीर आजार जडू शकतो.

अपुरी झोप

शरीराला पुरेशी झोप आवश्यक असल्यामुळे अपुरी झोप शरीराच्या नैसर्गिक चक्रात बाधा आणू शकते. यामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. शरीराला 7 ते 8 तासांची पुरेशी झोप मिळायला हवी.

मानसिक ताण

मानसिक तणावामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. जास्त तणावामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. याला आळा घालण्यासाठी नियमितपणे योगा किंवा मेडिटेशन करा.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)

VIEW ALL

Read Next Story