डिनरला जाण्यास नकार देणे अँकरला पडले महागात, टीम मालकाने...

तेजश्री गायकवाड
Feb 11,2025


नुकत्याच पार पडलेल्या बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. आता भारतीय वंशाच्या अँकर येशा सागरबाबत एक नवीन प्रकरण समोर आले आहे.

BPL मध्ये येशा सागर बीपीएलमध्ये करत होती अँकरिंग

बांगलादेश प्रीमियर लीग 2025 मध्ये भारतीय वंशाची स्पोर्ट्स अँकर येशा सागर चटगांव किंग्ज फ्रँचायझीशी जोडली गेली आहे.

सौंदर्याने वेधून घेतले सर्वांचे लक्ष

येशा ही स्पोर्ट्स अँकरिंगमधील सर्वात सुंदर महिला अँकर आहे. बांगलादेशमध्ये तिच्या अभिनयासोबतच ती तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते.

अनेक लीगमध्ये केले आहे अँकरिंग

येशा सागर केवळ बांगलादेश प्रीमियर लीगच नव्हे तर जगभरातील इतर अनेक लीगमध्ये अँकरिंग करताना दिसली आहे, परंतु पहिल्यांदाच तिच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.

येशा सागर मॉडेलिंगही करते

येशा सागर ही व्यवसायाने मॉडेल देखील आहे. तिने अनेक मोठ्या ब्रँडसाठी काम केले आहे. ती मॉडेलिंग जगतात एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.

डिनरला जाण्यास नकार दिल्याने मिळाली नोटीस

बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये, फ्रँचायझीच्या डिनरला उपस्थित न राहिल्याबद्दल येशाला चटगांव किंग्ज फ्रँचायझीचे मालक समीर कादिर चौधरी यांनी नोटीस बजावली आहे.


क्रिकेट97 या बांगलादेशी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार येशा संघाच्या प्रायोजक डिनरला जाणार होती, पण ती गेली नाही.


चटगांव किंग्जसोबतच्या वादात येशानेही बांगलादेश सोडला होता. या कारणास्तव संघ मालकाने तिच्याविरुद्ध नोटीस बजावली आहे.


मालकाने येशावर करारात लिहिलेल्या गोष्टींचे पालन न केल्याचा आरोप केला आहे.

VIEW ALL

Read Next Story