तूप हे अँटिऑक्सिडंट्स, निरोगी चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समृद्ध स्रोत आहे. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं.
रिकाम्या पोटी तूप सेवन केल्यानं शरीरातील पेशी निरोगी राहण्यास मदत होते. कोरड्या आणि निर्जीव त्वचेला ओलावा आणणं अन् मऊ ठेवण्याचं काम तुपामुळे होतं.
थंडीच्या वातावरणात रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यास शरीर उबदार राहते. त्यामुळे सौम्य ताप आणि सामान्य सर्दी बरे करण्यास मदत होते.
मेंदूला हायड्रेट ठेवणे अन् एकाग्रता सुधारण्यासाठी याचा फायदा होतो. तुपात असलेले व्हिटॅमिन ई मेंदूचे विकारांपासून संरक्षण करतं.
रोज सकाळी नाश्त्यापूर्वी एक चमचा तूप घेतल्याने कॅल्शियमची गरज पूर्ण होते. त्याचा फायदा वजन कमी करण्यासाठी देखील होतो.
देशी तूप डोळ्यांना थंडावा देणारे कारक म्हणूनही काम करते. ओमेगा 3 फॅटी ऍसिडमुळे डोळ्यातील कोरडेपणा किंवा थकवा कमी होतो.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा.