उपवासासाठी साबुदाण्याचे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा वडे, खीर किंवा खिचडी अशा निरनिराळ्या पदार्थ बनवले जातात. मात्र, तुम्ही कधी साबूदाणा सँडविच खाल्लंय का?
टेस्टी आणि क्रिस्पी साबुदाणा सँडविचची ही सोप्पी रेसिपी एकदा पाहूनच घ्या.
सगळ्यात पहिले दोन कप साबुदाणा घेऊन पाण्यातून धुवून घ्या. त्यानंतर एका बाउलमध्ये साबूदाणा, 2 उकडलेले बटाटे, 1 इंच किसलेले आले, दाण्याचा कूट, काळी मिरी आणि कोथिंबीर टाकून मिश्रण एकजीव करुन घ्या
आता हे मिश्रण टोस्टरमध्ये ब्रेडच्या आकारासारखी लावून घ्या. दोन्ही साइडने मिश्रण लावल्यानंतर मधोमध पनीर लावून घ्या. सँडविचच्या शेपमध्ये हे मिश्रण लावून घ्या.
आता हे मिश्रण टोस्टरमध्ये ठेवा व मंद आचेवर २ ते 3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर त्यावर बटर लावा.
उपवासासाठी तुम्ही आता साबुदाणा सँडविच घरातच बनवू शकता. तुम्ही चटणी किंवा सॉसबरोबर हे सँडविच खाऊ शकतात.