जेव्हा कधी आपल्याला मिठाई़ खाण्याची इच्छा होते त्यावेळी आपण लगेच ती खातो पण तुम्हाला हे माहित आहे निरोगी आरोग्यासाठी देखील मिठाई खाण्याची एक योग्य वेळ असते.
बहुतेक लोक चुकीच्या वेळी मिठाई खातात आणि यामुळे त्यांना लठ्ठपाणासारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते.अशा परिस्थितीत मिठाईचे सेवन केव्हा करावे याबाबत आरोग्यतज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, मिठाईचे सेवन सकळी नाश्तादरम्यान किंवा जेवणापूर्वी केले पाहिजे.
मिठाई पचवण्यासाठी जास्त वेळ लागतो. दुपारच्या जेवणानंतर लोक जास्त गोड खातात ज्यामुळे आपल्या कॅलरीज वाढतात आणि पचनक्रिया देखील मंदावते.
दुपारी जेवण्यापूर्वी मिठाईचे सेवन केल्यास लोक अन्नाचे सेवन कमी प्रमाणात करतात ज्यामुळे कॅलराडची संख्या कमी होऊ शकते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर सकाळी नाश्ताच्यावेळी मिठाई खाणं फायदेशीर ठरतं.
कधीही रात्री मिठाईचे सेवन करू नये.असे केल्यास लठ्ठपणा येऊ शकतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)