उरलेल्या इवल्याशा साबणाचा तुकडा फेकता? थांबा 'असा' करा उपयोग

Aug 02,2024


आपल्या दैनंदिन जीवनात आपण रोजच साबणाचा वापर करतो.सकाळच्या अंघोळीपासून ते कपडे धुण्यापर्यंत अशा घरातील अनेक कामांसाठी आपण साबण वापरत असतो .


रोज साबण वापरल्याने कालांतराने तो लहान होत जातो आणि हातामध्ये पकडता येत नाही.अशा वेळी आपण नवीन साबणाला त्या जुन्या साबणाचे तुकडे चिटकवतो किंवा ते तुकडे आपण फेकून देतो.


पण तुम्हाला माहित आहे का त्या उरलेल्या साबणाच्या तुकड्यांचा देखील आपण वापर करू शकतो.

कपाट सुगंधित ठेवा

काहीवेळा बदलत्या ऋतूमुळे कपाटामधून कुबट वास येतो. अशावेळी हा वास नाहीसा करण्यासाठी तुम्हा उरलेल्या साबणाचे तुकडे वापरू शकता.

बुटांचा वास घालवण्यासाठी

आपल्या पायांना अनेकदा घाम येत असतो आणि तोच घाम बुटांमध्ये मुरला की बुटांनी कुबट वास यायला लागतो.अशावेळी साबणाचे तुकडे सुती कपड्यामध्ये बांधून रात्रभर बुटांमध्ये ठेवल्यास दुर्गंध निघून जातो.

अटकते दरवाजे दूर करा

काहीवेळा लाकडाचे दरवाजे किंवा ड्रॉवरचे दरवाजे व्यवस्थितपणे उघड बंद होत नाहीत. त्यावेळी दोन्ही बाजूला असलेली स्टीलची पट्टी खराब झालेली असते. अशावेळी साबणाचे तुकडे त्यापट्टीवर घासल्यास गुळगुळीतपुणामुळे दरवाजे सहजपणे उघडण्यास मदत होते.

हँडवॉश तयार करा

साधारणपणे आपण हँडवॉश संपल्यावर बाजारातून विकत आणतो अशावेळी तुम्ही 10 ते 12 साबणाचे तुकडे क्रश करा आणि एकत्र करून त्यात पाणी टाकून तुम्ही हँडवॉश तयार करू शकता.

VIEW ALL

Read Next Story