मानवी शरीरातील प्रत्येक अवयव महत्त्वाचा असून, त्यातही हृदयाला अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त आहे.
हेच हृदय शरीरातील इतर अवयवांना रक्तपुरवठा करण्याचं काम करतं. शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर हृदयाचं आरोग्य ठरतं.
कोलेस्ट्रॉल हा एक मेणवजा पदार्थ असून, तो शरीरातील नसांमध्ये आढळतो. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात असणं ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.
कोलेस्ट्रॉलचेही दोन प्रकार असतात, Good आणि Bad कोलेस्ट्रॉल. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण 100 मिलीग्राम/ रोज किंवा त्याहून कमी असावं.
शरीरात गुड कोलेस्ट्रॉल 60 मिलीग्राम/ दररोज किंवा त्याहून जास्त असावं.
सर्वसाधारण सुदृढ व्यक्तीच्या शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण दर दिवशी सरासरी 40 मिलीग्राम किंवा त्याहून जास्त असतं.