केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आहे. या मंदिराची एकुण संपत्ती 1,20,000 कोटी आहे. या मंदिराच्या खजिन्यात हिरे, दागिने आणि सोन्याच्या मूर्तींचा सामावेश आहे. या मंदिरामध्ये भगवाण विष्णुंची सोन्याची मोठी मूर्ती विराजमान आहे, ज्याची किंमत 500 कोटी इतकी आहे.
देशामधील श्रीमंत मंदिरामध्ये दूसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशातील तिरूपती बालाजी मंदिर आहे. या मंदिरास दरवर्षी भाविक जवळपास 650 कोटी रुपये दान देतात. मंदिराकडे 9 टन सोन्याचा भंडार आहे सोबतच वेगवेगळ्या बँकेमध्ये फिक्स डिपॉजिटमध्ये 14,000 कोटी रुपये आहे.
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील शिर्डी साईबाबा हे मंदिर आहे. माध्यमांच्यानुसार या मंदिराच्या बँक खात्यामध्ये 380 किलो सोने, 4,428 किलो चांदी आणि जवळपास 1,800 कोटी रुपये जमा आहे. या मंदिरामध्ये दरवर्षी जवळपास 350 कोटी रुपयांचे दान दिले जाते.
ट्रेवल गाइड टूरमाईइंडियानुसार या मंदिरास दरवर्षी जवळपास 500 कोटी रुपये दान प्राप्त होते. देशातून आणि जगभरातून लाखो लोक दर्शनासाठी या मंदिरात येत असतात.
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमधील सिध्दिविनायक मंदिर हे अत्यंत प्रसिध्द मंदिर आहे. या मंदिराला 3.7 किलोग्राम सोन्याने कोट केले आहे. या मंदिरास दरवर्षी 125 कोटी रुपये दान दिले जाते.
भारतातील तामिळनाडू जिल्ह्यातील मदुराई येथे मीनाक्षी मंदिर आहे. या मंदिरात दरोरोज 20 ते 30 हजार भाविक दर्शनासाठी येत असतात. या मंदिराची वार्षीक कमाई जवळपास 6 कोटी रुपये इतकी आहे.
भारतातील श्रीमंत मंदिरामध्ये पुरीमधील जगन्नाथ मंदिराच नाव आवर्जुन घेतलं जातं. या मंदिरात अंदाजे 100 किलोपेक्षा आधिक सोने आणि चांदिचे सामान आहे. या मंदिरास लाखो रुपयांचे दान दिले जाते. यूरोप मधील एका भक्ताने 1.72 कोटी रुपये दान दिले होते.
देशाच्या सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी गणल्या जाणाऱ्या मंदिरात गुजरातमधील सोमनाथ मंदिर हे एक आहे. हे मंदिर जुने मंदिर असून ते जगभरात प्रसिध्द आहे. लाखो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. महमूद गझनीने या मंदिराची 17 वेळा लुट केली होती.
केरळमधील प्रसिध्द असणाऱ्या मंदिरापैकी सबरीमला अयप्पा हे एक मंदिर आहे. दरवर्षी जवळपास 10 कोटी लोक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या दरम्यान या मंदिरास जवळपास 230 कोटी रुपयांचे दान मिळते.
दिल्लीमधील कॉमनवेल्थ खेलगांवजवळ 100 एकरच्या परिसरात अक्षरधाम मंदिर आहे. जगातील सर्वीत मोठे मंदिर म्हणून गिनीज वल्र्ड रिकॉर्ड्मध्ये या मंदिराची नोंद झाली आहे. दरवर्षी लाखो भक्त या मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात.