क्रीम साडी, पूर्ण तयारी! अर्थमंत्र्यांनी यंदा नेसलेली साडी आहे फारच खास, कारण...

तेजश्री गायकवाड
Feb 01,2025


या वर्षी बजेट 2025 साठी, निर्मला सीतारामन यांनी पारंपारिक सोनेरी बॉर्डर क्रीम रंगाची साडी लाल रंगाच्या ब्लाउजसह नेसली होती.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मधुबनी कला आणि पद्म पुरस्कार विजेती दुलारी देवी यांच्या कौशल्याला अभिवादन म्हणून ही साडी नेसली होती.


दुलारी देवी या २०२१ चा पद्मश्री पुरस्कार विजेत्या आहेत. मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच अ‍ॅक्टिव्हिटी अर्थमंत्री पोहचल्या तेव्हा त्यांना दुलारी देवींनी ही मधुबनी साडी दिली होती.


दुलारी देवींनी ही साडी देऊन अर्थसंकल्पाच्या दिवसासाठी ती घालण्याची विनंती अर्थमंत्र्यांना केली होती.


वित्त निर्मला सीतारामन यांनी 2024-25 च्या अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी नेसली होती. राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही साडी आहे.


2024 च्या अंतरिम बजेटमध्ये निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालची निळ्या रंगची कांथा असलेली साडी नेसली होती.

2023

2023 च्या अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लाल ब्लाऊज आणि गोल्डन बॉर्डरची साडी परिधान केली होती.

2022

2022 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी ओडिशाची बोमकाई साडी नेसली होती.

2021

अर्थमंत्र्यांनी पोचमल्ली इक्कत ही पारंपारिक तेलंगणाची साडी 2021 च्या अर्थसंकल्पात परिधान करण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story