लोणचं कोणत्याही गोष्टीचं असो, अनेकदा ते खराब होण्याचा धोका असतोच. यामागे काय कारणं आहेत माहितीये?
अनेकदा लोणच्यामध्ये बाष्प किंवा पाण्याचा अंश राहिल्यास ते खराब होतं. ज्या कारणास्तव वेळोवेळी ते उन्हात ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
कधीही ओलसर किंवा खराब हातांनी लोणच्याला स्पर्श करु नये. लोणचं बरणीतून काढताना कायमच पूर्णत: कोरडा चमचा वापरा, अन्यथा ते खराब होण्याचा धोका असतो.
लोणचं तयार करताना त्यात पुरेशा तेलाचा वापर न झाल्यास बाष्पाचं प्रमाण वाढून ते खराब होण्याचा धोका असतो.
लोणचं तयार करत असताना त्यात मिसळल्या जाणाऱ्या मसाल्यांचा क्रम चुकल्यास लोणचं खराब होण्याचा जास्त धोका असतो.
लोणच्यामध्ये व्हिनेगरचा वापर केला जात असल्यास त्याचं प्रमाण चुकल्यासही लोणचं खराब होण्याचा धोका असतो.