FASTag च्या माध्यमातून तुम्ही टोल नाक्यावर ऑटोमॅटिक पेमेंट करु शकता. दरम्यान सरकारने फास्टटॅग केवायसी अपडेट करण्यासाठी 29 फेब्रुवारीची डेडलाइन दिली आहे.
29 फेब्रुवारीपर्यंत FASTag KYC अपडेट न करणाऱ्याचे FASTag ब्लॅकलिस्ट केले जातील. यानंतर ते टोलनाक्यावर काम करणार नाहीत आणि कदाचित तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.
FASTag KYC अपडेट करण्यासाठी fastag.ihmcl.com वेबसाईटवर जा. यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल. OTP नेही तुम्ही लॉग इन करु शकता.
FASTag KYC अपडेट करताना जर NHAI FASTag वर लॉग इन होत नसेल तर MyFASTag App वर रजिस्टर करावं लागेल. बँकेचे FASTag युजर्स जवळच्या शाखेत जाऊ शकतात.
लॉग इन केल्यानंतर डाव्या बाजूला असणाऱ्या My Profile वर क्लिक करा. यामध्ये तुम्हाला KYC च्या सब सेक्शनवर क्लिक करावं लागेल.
यानंतर KYC मध्ये जाऊन Custome Type निवडा. नंतर माहिती भरा आणि सोबत ओळखपत्राची प्रत जोडा. यानंतर Declaration वर क्लिक करा.
जर तुमच्याकडे एखाद्या बँकेने जारी केलेला FASTag असेल तर त्यासाठी netc.org.in/request-for-netc-fastag वेबसाईटवर लॉग इन करावं लागेल.
यानंतर आपली बँक निवडा आणि लॉग इन करा. प्रत्येक बँकेची KYC अपडेट प्रक्रिया वेगळी आहे. तुम्ही बँकेशीही संपर्क साधू शकता.