यात्रेकरूंना नाही खाता येणार 'हे' पदार्थ
1 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरु होणार असून 31 ऑगस्टपर्यंत ही यात्रा असणार आहे. तुम्हीदेखील अमरनाथ यात्रेला जाणार असाल या यात्रेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) ने या वर्षीच्या यात्रेसाठी कुठले पदार्थ चालणार आणि कुठे नाही याची यादी जाहीर केली आहे.
पुरी, पिझ्झा, बर्गर, भरलेले पराठे, डोसे, ब्रेड विथ बटर या पदार्थांवर बंदी आहे.
मलईचे पदार्थ, लोणचे, चटण्या, तळलेले पापड, चाउमीन, फ्राईड राइसवही बंदी आहे.
हलवा, जिलेबी, गुलाब जामुन, लाडू, खवा बर्फी, रसगुल्ला खाता येणार नाही.
कुरकुरीत स्नॅक्स, चिप्स, नमकीन, पकोडा, समोसा, तळलेले ड्रायफ्रुट्स आणि इतर सर्व तळलेले पदार्थ खाता येणार नाही.
याशिवाय यात्रेत सर्व मांसाहारी पदार्थ, दारू, तंबाखू, गुटखा, पान मसाला, धूम्रपान आणि इतर मादक पदार्थांवर यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.
पोहे, उत्तपम, इडली, व्हेजिटेबल सँडविच, रोटी/फुलका, दाल रोटी, मिसळ रोटी, मक्की की रोटी, डाळ-रोटी असे हलके पदार्थ खाऊ शकतात.
तृणधान्ये, कडधान्ये, हिरव्या भाज्या, बटाटे, हिरव्या भाज्या, न्यूट्रेला सोया चंक्स, बेसन करी, साधी मसूर, हिरवी कोशिंबीर, फळे आणि अंकुर, साधा भात, जिरा तांदूळ, खिचडी आणि न्यूट्रेला राइस खाऊ शकता.
प्रवासात हर्बल टी, लो फॅट दूध, लिंबूपाणी, भाज्यांचे सूप घेता येईल. चॉकलेट, खीर, ड्रायफ्रुट्स, मध यांचेही सेवन करता येईल.
यात्रेदरम्यान 14 किलोमीटर लांब मार्गावर चालताना यात्री पूर्णपणे ऊर्जावान राहावे. त्यांचे स्वास्थ उत्तम राहावे. यासाठी हे बदल करण्यात आले आहे.