भारतामध्ये सॅटलाइट शहरे तयार होतायत, त्यामध्ये आंध्र प्रदेशच्या श्री सिटीचा समावेश आहे.
श्री सिटीमध्ये कॅडबरीमध्ये चॉकलेट बनवणारी कंपनी मोंडेलेजची मॅन्युफॅक्चरींग फॅक्ट्री आहे.
मॉंडेलेजची फॅक्ट्री भारतातीलच नव्हे तर आशियातील सर्वात मोठी फॅक्ट्री आहे.
ईटीच्या रिपोर्टनुसार, मोंडेलेजने 2016 मध्ये 1250 कोटी रुपयांत आपली फॅक्ट्री तयार केली होती.
वर्षाला 2 लाख 50 हजार टन चॉकलेट्स बनवण्याची या फॅक्ट्रीची क्षमता आहे.
या फॅक्ट्रीमध्ये डेअरी मिल्क, फाइव्ह स्टारसह 8 प्रकारचे चॉकलेट तयार केले जातात.
मोंडेलेजच्या महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्येदेखील फॅक्ट्री आहेत.
मोंडेलेज ही इंग्लंडची कंपनी असून त्याची सुरुवात 1824 मध्ये झाली.