दही आपल्या आरोग्यासाठी तर चांगले असतेच, पण तुम्हाला माहिती आहे का? दही केसासाठीसुद्धा खूप फायदेशीर आहे.
जर तुम्ही पांढऱ्या केसांनी त्रासले असाल आणि अनेक उपाय करूनही या समस्येचे समाधान मिळत नसेल तर, दह्यात काही गोष्टी मिक्स करून केसांना लावल्यास फायदा होऊ शकतो.
नैसर्गिकरित्या केसांना काळे करण्यासाठी मेथीच्या दाण्यांची पावडर दह्यात मिक्स करून तुम्ही लावू शकता.
दह्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून लावल्यास केस मुळापासून काळे होतात.
कांद्याचा रस दह्यात मिक्स करून लावल्यास तुमचे लांब होतील.
आठवड्यातून एकदातरी तुम्ही केसांना खोबरेल तेल लावायला हवे. यामुळे तुमचे केस काळे आणि चमकदार होतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)