दह्यात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामुळं आहारात रोज दही खाण्याचा सल्ला दिला जातो
काही लोकांना दह्यात साखर किंवा मीठ टाकून खायला आवडते, पण या दोघांपैकी आरोग्यासाठी काय चांगलं
दह्यात साखर टाकून खाल्ल्यास साखरेमुळं अधिक कॅलरी शरीरात जातात.
पण दह्यात मीठ टाकून खाल्ल्यास कॅलरीचा प्रभाव नगण्य असतो.
मिठाच्या तुलमेत साखर कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढवते.
मीठ असलेले दही शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढवते, जे इलेक्ट्रोलाइट समतोल राखते
पण ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मीठदेखील बेतानेच खावे
ज्यांना मधुमेह किंवा वजनावर नियंत्रण ठेवायचे हे त्यांनी मीठ टाकून दही खावे
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)