भारतीय अर्थसंकल्पामध्ये काही मित्र देशांना हजारो ते शेकडो कोटींची मदत देण्यात आली आहे.
एका देशाला तर भारताने 2150 कोटी रुपये देऊ केलेत. नेमकं कोणत्या देशाला किती निधी भारत या आर्थिक वर्षात मदत म्हणून देणार ते पाहूयात...
जगातील वेगवेगळ्या भागातील विकसनशील देशांना भारत 150 कोटींची मदत करणार आहे.
आफ्रिकेतील देशांना भारताकडून 225 कोटींची मदत केली जाणार आहे.
जुना मित्र देश असलेल्या अफगाणिस्तानला भारत 100 कोटी रुपये देणार आहे.
मागील वर्षी सत्तापालट झालेल्या बांगलादेशला भारत 120 कोटी रुपये देणार आहे.
मॉशिरिअसला भारत 500 कोटी देणार आहे तर मालदीवला भारत 600 कोटी देणार आहे.
नेपाळला भारत 700 कोटी रुपयांची मदत एका आर्थिक वर्षात करणार आहे.
भारत सर्वाधिक मदत भुतानला करणार असून ही रक्कम तब्बल 2150 कोटी इतकी आहे.