आजच्या घडीला मोठा वर्ग शेती व्यवसायाकडे वळला आहे.
पोल्ट्री फार्म उघडण्याआधी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.
कुक्कुट पालनासाठी तुम्ही 5 हजारांपासून 5 लाखांपर्यंत कोंबड्या घेऊ शकता.
व्यवसाय सुरु करण्याआधी पशु चिकित्सा अधिकारी जमिनीचे निरीक्षण करुन एनओसी देतो. यासोबतच राज्य प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून एनओसी मिळणे आवश्यक असते.
पोल्ट्री फार्मचा व्यवसाय नदी, नाला, पाण्याचा टॅंकपासून 100 मीटरच्या अंतरावर असावे.राष्ट्रीय महामार्गापासून 1000 मीटर आणि राज्य हायवेपासून 50 मीटर अंतरावर असावे.
शाळा किंवा धार्मिक स्थळापासून 500 मीटर दूर असावे. तिथे विजेची सोय असावी.
जमिन समतल असावी. तिथे पाणी साचू नये.
पोल्ट्री फार्मच्या सीमेपासून कोंबड्या 10 मीटर दूर असाव्यात.