समुद्रातून निर्माण होणाऱ्या बाष्पामुळे वारंवार ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र पुढील 2-3 दिवसांपासून अवकाळी पावसाचं प्रमाण कमी होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय.
मोका चक्रीवादळ 13 किंवा 14 तारखेला बंगाल उपसागराच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. मात्र या वादळाचा महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम होणार नसल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केलाय.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच ओडिशा समुद्रकिनारील आणि आसपासच्या परिसरातील गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
मोका चक्रीवादळामुळे 8 ते 12 मेदरम्या बंगालच्या समुद्र किनारी भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान 70 ते 80 किमी वेगाने वारे वाहतील असाही अंदाज आहे.
10 मे रोजी मोका चक्रीवादळाचा बंगाल खाडी, बंगालची पूर्व-मध्य खाडी आणि अंदमान समुद्रा किनारी भागात वेग वाढण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
मोका चक्रीवादळाचा परिणाम इतर राज्यातही पाहिला मिळतोय. अनेक राज्यात वेगाच्या वाऱ्यासह पावसाची नोंद करण्यात आली आहे. बंगाल खाडी आणि दक्षिण अंदमान नजीकच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी मोका नावाचं चक्रीवादळ घोंघावतंय. हवामान विभागाने बंगाल आणि ओडिसामध्ये अलर्ट जारी केलं आहे. मच्छिमार, लहान जहाजांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.