दिल्लीतल्या आझादपूर बाजारात भाजी विक्रेत्या रामेश्वरची कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट घेतली. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Aug 14,2023


काही दिवसांपूर्वी रामेश्वर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वाढत्या महागाईचा उल्लेख करत ते भावूक झाल्याचं या व्हिडिओत दिसत होतं.


टोमॅटो खरेदी करण्यासाठी ते घाऊक बाजारात गेले होते, पण वाढलेल्या किमतीमुळे टोमॅटो त्यांच्या आवाक्याबाहेर होते. आपली व्यथा कॅमेरासमोर सांगताना त्यांना रडू कोसळलं होतं.


त्यानंतर रामेश्वर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. माझ्या सारख्या लहान व्यक्तीला राहुल गांधी भेटल्यास ते माझं सौभाग्य असेल असं रामेश्वर यांनी म्हटलं होतं.


रामेश्वर यांचं स्वप्न राहुल गांधी यांनी साकार केल. राहुल गांधी यांनी रामेश्वर यांना भेटीसाठी आमंत्रित केलं. इतकंच नाही तर राहुल गांधी आणि रामेश्वर यांनी एकत्रित जेवणही केलं.


राहुल गांधी यांनी ट्विट करत रामेश्वर यांच्याबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. रामेश्वर एक जिंदादील व्यक्तीमत्व असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.


रामेश्वर यांच्यात करोडो भारतीयांच्या स्वभावाची झलक दिसते. प्रतिकुल परिस्थितीतही हसतमुख जगण्याचं आणि पुढे जाण्याचं त्यांचं धैर्य उल्लेखनीय असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय.


रामेश्वर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची व्यथा संसदेपर्यंत पोहोचली होती. अनेक लोकांनी रामेश्वर यांच्या मदतीसाठी हात पुढे केले होते.


रामेश्वर हे मुळचे उत्तरप्रदेशमधल्या कासगंज इथं राहाणारे आहेत. पण गेल्या पोटापाण्यासाठी गेल्या दहा-बारा वर्षांपासून ते दिल्लीत राहातात. रामेश्वर यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची आहे.

VIEW ALL

Read Next Story