दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. स्मरणशक्ती वाढण्यासाठी काय करावं? असा प्रश्न पडला असेल तर पुढे देण्यात आलेली योगासने फायदेशीर ठरतील.
परीक्षेच्या काही दिवस आधीच ही योगासने करायला सुरुवात करा. म्हणजे तुम्हाला अभ्यासाचा जास्त ताण येणार नाही.
बकासन शरीराच्या संतुलनासाठी फायदेशीर आहे. यामुळे शरिराचे विविध अंग एकावेळी कार्य करतात. यामुळे एकाग्रता वाढते.
पाय सरळ करुन बसा आणि शरीर पुढच्या बाजूस झुकवा. डोकं गुडघ्यावर ठेवा. यामुळे रक्त प्रवाह वाढेल. बुद्धी तेज होईल.
कमल आसनात बसून ध्यान करण्यास पद्मासन म्हणतात. बुद्धी तेज करण्यासाठी आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी याचा फायदा होतो.
एकाग्रता वाढण्यासाठी आणि बुद्धी तेज होण्यासाठी हे उपयोगी आहे. यामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते.
यामुळे डोक्याचा रक्तप्रवाह सुधारतो. स्मरणशक्ती वाढण्यासाठई शीर्षासन करायला हवे.
परीक्षेआधी स्मरणशक्ती वाढवू इच्छित असाल तर या टिप्स तुम्हाला उपयोगी येतील.