नीट लक्ष दिल्यावर मासे निष्क्रिय अवस्थेत असल्याच दिसून येतं. त्यामुळे मासे झोपलेत असं वाटतं.
काही मासे खूप वेळ अशा अवस्थेत असतात. पण काही मासे अगदी या अवस्थेत कमी वेळाकरता असतात आणि झोप पूर्ण करतात.
अनेक माशांची ही स्थिती रात्रीच्या वेळी अधिक असते. त्यामुळे यावरुन मासे झोपत असतील असा निष्कर्ष निघतो.
अनेक मासे या स्थितीमध्ये पाण्याच्या अतिशय खालच्या भागी जाऊन झोपतात. डॅमसेल मासे कोरल रीफच्या फांद्यांमध्ये आश्रय घेतात तर वेल्श कॅटफिश नावाचा मासा जवळच्या वनस्पतींमध्ये पोहोचतो.
पॅरट फिश रात्री खाली जातात आणि स्वतःभोवती एक श्लेष्मा कक्ष तयार करतात जे त्यांचे परजीवीपासून संरक्षण करतात.