गोव्याची माणसं जिकती गोड, तितकीच तेथील बसस्टॉपची नावंसुद्धा... गोव्यात भटकंती करायची असेल तर, बस प्रवास हा उत्तम पर्याय. स्थानिक बससेवेच्या माध्यमातून तुम्ही या राज्यात अगदी किफायतशीर दरात फिरू शकता.
गोव्याच्या दैनंदिन भाषेतही स्थानिकांच्या मनातला गोडवा जाणवतो. याची प्रचिती तुम्हाला गोवा भेटीतच येईल. त्यामुळं गोव्यात एकदातरी यायलाच लागतंय.
या प्रवासात गोव्यातील बस स्थानकांच्या नावाकडे मात्र नक्की लक्ष द्या. कारण, गोव्यातील ही बस स्थानकं/ बस थांबेही लक्ष वेधणारी अशीच आहेत.
एका साखळीच्या पुलावर बस थांबवायची असल्यास, साखळे पुलार द्या असं सांगून तिकीट काढता येते.
इतकंच नव्हे, तर कोर्टाकडे, हाथीकडे, स्कुलाकडे, वडाकडे, मठाकडे असं सांगून स्थानिक, नजीकच्याच प्रसिद्ध ठिकाणाचा उल्लेख केला जातो.
गोव्यातील चालक आणि वाहकांना कायमच या ठिकाणांची माहिती असते, त्यामुळं तिथं जाऊन तुम्ही न घाबरता या ठिकाणांचं तिकीट काढा आणि निर्धास्त फिरा.