संगम नगरी अशी ओळख असणाऱ्या प्रयागराज इथं 13 जानेवारीपासून कुंभ मेळ्याची सुरुवात झाली आहे.
देशोदेशीच्या साधूसंत आणि साध्वी या मेळ्यामध्ये सहभागी होत अध्यात्मिक प्रवासाला निघाले आहेत. इथं येणाऱ्या भाविकांचा आकडाही मोठा आहे.
कुंभ मेळा हे एक असं ठिकाण आहे जिथं मोठ्या संख्येनं लोक साधूसंतांचा मार्ग निवडत संन्यास घेण्याचा निर्णय घेतात.
2019 च्या कुंभ मेळ्यात हेच चित्र पाहायला मिळालं होतं. यामध्ये संन्यास घेणाऱ्या तरुणांचा आकडा मोठा होता.
सूत्रांच्या माहितीनुसार 2019 मध्ये कुंभ मेळ्यादरम्यान जवळपास 10 हजारांहून अधिक तरुणांनी संन्यस्त जीवनाची दीक्षा घेतली होती.
प्राथमिक माहितीनुसार यामध्ये इंजिनिअर, डॉक्टर आणि पदवीधर तरुणांचा सहभाग होता.
अखिल भारतीय अखाडा परिषदेच्या माहितीनुसार दीक्षा समारंभाचं आयोजन फक्त कुंभ मेळ्यादरम्यानच केलं जातं. दीक्षा पूर्ण झाल्यानंतर कोणीही व्यक्ती साधू म्हणवतो.