आपण करोडपती व्हावं असं जगातल्या प्रत्येकाला वाटत असतं. पण फक्त इच्छा असून श्रीमंत होता येत नाही. यासाठी प्लानिंग गरजेचं आहे.
तुमच्या प्लानिंगमध्ये या 10 गोष्टी असतील तर करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही.
एक आर्थिक व्हिजन बनवा आणि त्यावर काम करा.प्लान करुन विसरुन जाऊ नका.
90 डेज सिस्टिम बनवा आणि 90 दिवसांनी तुमची प्रगती किती झाली याची पडताळणी करा. काही कमी असेल तर दूर करा.
एनर्जेटीक रुटीनसाठी डेली फ्लो गरजेचा आहे. फ्लोमुळे हाय परफॉर्मन्स आणि कॉन्फिडन्स वाढतो. ज्यामुळे तुम्ही मोठा विचार करु लागता.
आपल्या आजुबाजूला असं वातावरणं ठेवा ज्यामुळे तुम्हाला भविष्यातील प्लान बनवण्यास सोपे जाईल.
रिझल्टवर फोकस करा. एखादं काम 2 मिनिटात होणारं असेल तर त्यात जास्त वेळ घालवू नका.
मैत्री सर्वांशी होऊ शकते. पण आर्थिक सल्लागार सर्वच होऊ शकतील असे नाही.
दुसऱ्यांनी सांगितलेलं काळजीपूर्वक ऐका. त्यातील तुमच्या कामाची गोष्ट ओळखता आली पाहिजे.
मी हे कसं करु असा प्रश्न सुरुवातील मनात येईल. पण माझ्यासाठी हे काम कोण करु शकेल, असा विचार बदलला पाहिजे.
जसे यश मिळेल तशी यशाची व्याख्या आणि त्याचे महत्व बदलत गेले पाहिजे.
एखाद्या कामाची हीच योग्य वेळ आहे, असे वाटले तर वाट पाहत बसू नका.