लोकलचे किंवा प्लॅटफॉर्मचे तिकिट काढण्यासाठी तिकिट खिडकींवर कधी खूप रांग असते. अशावेळी कधी कधी ट्रेन मात्र निघून जाते.
मात्र, रांगेत उभे न राहताही तुम्ही दोन मिनिटांत प्लॅटफॉर्म किंवा लोकलचे तिकिट काढू शकणार आहेत.
रेल्वेचे मुंबई लोकलसाठी एख खास अॅप आहे. या अॅपचे नाव यूटीएस (UTS) आहे.
यूटीएस अॅपच्या मदतीने तुम्ही प्लॅटफॉर्म आणि अनरिझर्व्ह तिकिट लगेचच काढू शकता
गुगल प्ले स्टोरवरुन तुम्ही हे अॅप डाउनलोड करु शकता
त्यानंतर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कुठपर्यंत तिकिट हवंय तसंच प्लॅटफॉर्म तिकिटही तुम्ही काढू शकता
मात्र, रेल्वे स्थानक परिसरातून १ मीटर लांब असतानाच तुम्ही तिकिट काढू शकता