अचानक फंडची गरज लागते त्यांच्यासाठी म्युच्यूअल फंडवर लोन घेण्याचा पर्याय चांगला ठरतो.
म्युच्यूअल फंडवरील व्याजदर हे पर्सनल लोनपेक्षा कमी असतात.
लोन घेतल्यावरील तुमचा तुमच्या म्युच्यूअल फंडवरील अधिकार अबाधित राहतो.
ही प्रक्रिया डिजिटल माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकते. यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया कमी असते.
कर्जाची मर्यादा ही तुमच्या म्यूच्यूअल फंडच्या बाजार मुल्यावर ठरते.
इक्वीटी फंडवर लोनची मर्यादा कमी असते. डेट्स फंडवर लोनची रक्कम जास्त मिळू शकते.
बाजारात उतार आल्यास मूच्यूअल फंड्सची किंमत कमी होऊ शकते.
बाजार पडल्यास बॅंक किंवा NBFC अतिरिक्त कोलेटरल मागू शकते.
कर्ज फेडू न शकल्यास बॅंका म्यूच्यूअल फंड्स विकून आपली रक्कम वसूल करते.
(म्यूच्युअल फंड गुंतवणूक ही बाजार जोखमीच्या अधिन असते, गुंतवणुकीपूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या.)