EPFO सदस्य उमंग अॅपच्या मदतीने PF मधील जमा रक्कम काढू शकतात.
सर्वात आधी उमंग अॅप डाऊनलोड करा आणि स्वत:ची नोंदणी करा.
पीएफचा नोंदणीकृत मोबाईलनंबर देऊन उमंग अॅपमध्ये लॉगिन करा.
तुमच्यासमोर अनेक पर्याय दिसतील. यातील EPFO निवडा.
रेज क्लेम निवडा. ओटीपी जनरेट करण्यासाठी UAN टाका.
मोबाईलमध्ये आलेला ओटीपी टाका. विड्रॉअलचा टाईप निवडा आणि फॉर्म भरा.
अर्ज भरल्यावर तुम्हाला एक स्लीप मिळेल. त्यावर रेफरन्स नंबर असेल. विड्रॉअल रिक्वेस्ट ट्रॅक करण्यासाठी याचा उपयोग होईल.
फंड क्लेम केल्यानंतर 3 ते 5 दिवसात पैसे खात्यामध्ये ट्रान्स्फर होतील.