नवीन कर प्रणालीनुसार, कोणत्याही व्यक्तीचे एका वर्षातील कमाल उत्पन्न 3,00,000 रुपयांच्या सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल ( त्यांना ITR भरावा लागेल.
जर एखादी व्यक्ती भारतातील रहिवासी असेल आणि ज्याचा भारताबाहेरील कोणत्याही मालमत्तेत हिस्सा असेल त्याला ITR दाखल करावा लागेल.
ज्या व्यक्तीच्या बँक चालू खात्यात 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक बचत आहे त्यांनी ITR दाखल करणे आवश्यक आहे.
जर एखाद्या व्यक्तीने एक लाख रुपयांपेक्षा अधिकची रक्कम वीजबिलासाठी खर्च केले असतील तर त्यालाही आयटीआर भरावा लागेल
एका पेक्षा जास्त सेव्हिंग अकाऊंट असणाऱ्या आणि त्यामध्ये 50 लाखांपेक्षा जास्त रक्कम असणाऱ्यांनाही आयटीआर भरावा लागणार आहे.
केंद्र सरकारच्या www.incometax.gov.in वेबसाइट नोंदणी करा. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फॉर्म 16 सारखी कागदपत्रे, जमा करा आणि फॉर्मध्ये योग्य ती माहिती भरा.
सहसा आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख चुकवू नका. जर एखाद्याने अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे आयकर रिटर्न भरणे चुकवले तर ते विलंब शुल्कासह फाइल करू शकतात.
आयटीआर उशीरा भरल्याबद्दल आयकर कायदा, 1961 च्या कलम 234F अंतर्गत व्यक्तींना 5,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागतो. लहान करदात्यांना ज्यांचे करपात्र वेतन 5 लाख रुपयांपेक्षा जास्त नाही त्यांना 1,000 रुपये दंड भरावा लागेल. (सर्व फोटो - freepik.com)