मयंती बिन्नी ही रॉजर बिन्नीची सून आहे. तिचा नवरा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून क्रिकेट खेळला आहे. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर बिन्नी आणि मयंती यांनी २०१२ मध्ये लग्न केले.
मयंती आणि स्टुअर्ट यांची पहिली भेट इंडियन क्रिकेट लीग (ICL) दरम्यान झाली होती. मयंतीने करिअरमधील पहिली मुलाखत स्टुअर्ट बिन्नीची घेतली.
या मुलाखतीत मयंतीने बिन्नीला त्याच्या रिलेशनशिपबद्दल विचारले. नंतर दोघांनीही एकत्र आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला.
37 वर्षीय मयंतीचा जन्म 8 फेब्रुवारी 1985 रोजी दिल्लीत झाला. तिचे वडील संजीव लँगर निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत.
तिच्या आईचे नाव प्रेमिंदा लँगर आहे. मयंतीला सुरुवातीपासून क्रीडा पत्रकार बनण्याची आवड होती आणि आज ती स्टार स्पोर्ट्ससाठी काम करते.
सोशल मीडिया सेन्सेशन मयंतीचे इंस्टाग्रामवर साडे सात लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
तिने तिच्या करिअरची सुरुवात फुटबॉल सामन्यांपासून केली, पण आज ती आयपीएलसह क्रिकेट सामन्यांमध्ये अधिक अँकरिंग करताना दिसते.