77 वा की 78 वा स्वातंत्र्यदिन? एका क्लिकवर गोंधळ होईल दूर

Pravin Dabholkar
Aug 12,2024


दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो. सध्या देशभरात याची जोरदार तयारी सुरु आहे.


15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटिश शासनातून मुक्त झालो. अनेकांनी यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.


यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो. दरम्यान कितवा स्वातंत्र्यदिन हे अनेकांना माहिती नसते.


77 वा की 78 वा स्वातंत्र्यदिन? याबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ असतो.


15 ऑगस्ट 1947 ला आपण पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला.


त्यामुळे 2024 साली आपण देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत.


आपल्या स्वातंत्र्यासाठी किती जणांनी बलिदान दिलं, त्यांची आठवण काढण्याचा हा दिवस.


दरवर्षी 15 ऑगस्टला पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशाला संबोधित करतात.

VIEW ALL

Read Next Story