लग्नानंतर महिला या भांगमध्ये कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या, पायात पैंजण आणि पायाच्या बोटामध्ये जोडवी घालतात.
पण तुम्हाला पायात पैंजण अन् जोडवी घालण्यामागील कारणं माहितीयेत का? शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारण जाणून घ्या.
पैंजण म्हणजे सकारात्मक ऊर्जा, असं मानलं जातं. जेव्हा पैंजणचा आवाज वातावरणात घुमतो तेव्हा आपल्या शरीरात प्रवेश करणाऱ्या नकारात्मक ऊर्जेपासून आपला बचाव होतो.
ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्राशी आहे. चंद्र आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो आणि मानसिक शक्ती प्रदान करतो.
पैंजण घातल्यामुळे हाडे मजबूत होतात असं म्हटलं जातं. पण, याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ज्योतिषशास्त्रात चांदीचा संबंध चंद्राशी मानला जातो. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि शनिपासून हाडे मजबूत होतात.
चांदी शरीराला थंडावा देते. यामुळे पायात पैंजण घातल्याने शरारीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
एक्यूप्रेशर थेरपीमध्ये असं म्हटलं जातं की जोडवी घातल्याने मज्जासंस्था आणि स्नायू मजबूत राहतात. जोडवी एका विशिष्ट नसावर दबाव निर्माण करते. ज्यामुळे गर्भाशयात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते.
जोडवी घातल्याने त्याचा दाब बोटांच्या नसेवर पडतो आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. वैद्यकीय शास्त्रानुसार मासिक पाळी नियमित राहण्यास मदत होते.
असं मानलं गेलं आहे की, माशांच्या आकाराची जोडवी घालणे खूप प्रभावी मानले जाते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)