भारतीय रेल्वेच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन या हाय स्पीड, लाँग डिस्टन्स इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन अर्थात ईएमयू आहेत.
रेल्वे विभागात या रेल्वे येत्या काळात राजधानी एक्सप्रेसची जागा घेऊ शकतात.
वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनमध्ये एसी फर्स्ट क्लास, एसी टू टियर, एसी थ्री टियर अशा सुविधा उपलब्ध आहेत. या रेल्वेनं प्रवास करताना वेळेची मोठी बचत होते.
सेन्सर लायटिंगपासून इतर अनेक अत्याधिनुक सुविधा या रेल्वेमध्ये देण्यात आल्या आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या रेल्वेची सेवा सर्वप्रथम सिकंदराबाद- पुणे या स्थानकांदरम्यान सुरु होणार आहे.
वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनसाठी कथित स्वरुपात निवडण्यात आलेली ही स्थानकं अनपेक्षित असली तरीही प्रवाशांना सुविधा देण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतला जाऊ शकतो.