टॅक्स वाचवण्यासाठी अनेकजण बनावट पावत्या जोडतात. पण अशांवर आता आयकर विभागाची नजर असणार आहे.
बनावट कागदपत्र जोडणाऱ्यांविरोधात आयकर विभाग कडक कारवाई करते. शैक्षणिक कर्जापासून भाड्याचं घर दिल्याचे खोटे दावे केले जातात.
टॅक्स वाचवण्यासाठी घर भाड्याने दिल्याची खोटी स्लीप दाखवली जाते.
आयटीआरमध्ये बनावट नोटीस जोडणाऱ्यांना आयकर विभाग नोटीस पाठवते.
पकडले गेल्यास मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई केली जाते.
आयकर विभागाने नियम तोडणाऱ्यांसाठी नवी टेक्निक अवलंबली आहे.
कॉम्प्युटर आधारित प्रक्रियेने दस्तावेज गोळा केले जाणार आहेत.
डेटामध्ये काही गडबड आढळल्यास आयकर विभाग तात्काळ नोटीस पाठवेल.
देशात खोटे डॉक्युमेंट जोडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
बनावट कागदपत्रांचा उपयोग करणे आयकर विभागाच्या नियमांचे थेट उल्लंघन आहे.