रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते.
त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया.
सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते.
40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते.
हा एक नॉन लिंक्ड, एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे.
हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता.
या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.