ज्या रावणाला संपूर्ण जग घाबरत होतं , त्या रावणालाही तीन योद्धांची भीती होती. भगवान राम यांच्या व्यतिरिक्त दोन योद्धे रावणाला मृत्यूदंड देऊ शकत होते ते म्हणजे रावण आणि बाळी.
रावण इतका पराक्रमी आणि शक्तीशाली होता की त्याचा वध करण्यासाठी देवालाच जन्म घ्यावा लागला.
परंतु भगवान राम यांच्या व्यतिरिक्त हनुमान आणि बाळी देखील सहजपणे वध करू शकत होते.
हनुमान इतके सामर्थ्यवान होते की त्यांना हव असत तर ते स्वत: रावणाचा वध करू शकत होते पण त्यांनी तसे केले नाही कारण त्यांना प्रभु रामांची आज्ञा नव्हती. दुसरा बाळी होता, ज्याला ब्रह्मदेवाने वरदान दिले होते की तो ज्याच्याशी युद्ध करेल त्याला त्याचे अर्धे सामर्थ्य मिळेल.
एकदा रावण बाळीशी युद्ध करायला आला होता. त्यावेळी बाळीची पूजा होत होती. रावण बालीला वारंवार आव्हान ज्यामुळे त्याचा उपासनेत अडथळे निर्माण होत होते.
जेव्हा रावण राजी झाला नाही तेव्हा बाळीने त्याला आपल्या बाहूत धरले आणि चार समुद्रांभोवती प्रदक्षिणा घेतल्या.
बाळी खूप शक्तिशाली होता आणि इतका वेगवान होता की तो दररोज सकाळी चार महासागरांना प्रदक्षिणा घालत असे.
प्रदक्षिणा केल्यावर ते सूर्याला अर्घ्य देत असत. जोपर्यंत बाळीने प्रदक्षिणा करून सूर्याला अर्घ्य दिले, तोपर्यंत त्याने रावणाला आपल्या हाताखाली दाबून ठेवले.
बाळीची इच्छा असती तर तो रावणाचा वध करू शकला असता, तरीही रावणाला स्वतःचा इतका अभिमान होता, जो त्याच्या मृत्यूचे कारण बनला.