ब्रह्मांडांत अनेक रहस्ये आहेत. यातील कित्येक रहस्य शास्त्रज्ञांसाठी उलगडली नाहीयेत. अलीकडेच नासाने एक फोटो शेअर केला आहे.
नासाने शेअर केलेला फोटात अंताराळात एक मानवी हात असल्याचे दिसत आहे. अंतराळात दिसणाऱ्या या हाताला Hand Of God म्हणजेच देवाचा हात असं म्हटलं गेलंय.
नासाने या फोटोमागचे सत्यदेखील उलगडले आहे. याला नेब्युला ऑफ एनर्जी असं म्हणतात. सोन्यासारखा दिसणारा हाताचा आकार खरं तर एक उर्जेचा पुंजका आहे.
उर्जेचा हा पुंजका तारा तुटल्यानंतर शिल्लक राहतो. Hand Of God हा पीएसआरब बी 1509-58 पल्सर म्हणून ओळखला जातो.
अंतराळात दिसणाऱ्या या हाताचा व्यास सुमारे 19 किमी असून पृथ्वीपासून त्याचे अंतर 17 हजार हजार प्रकाश वर्षे आहे.
नासाने दिलेल्या माहितीनुसार, 1700 वर्षांपूर्वी झालेल्या सुपरनोव्हा स्फोटानंतर याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचला आहे.
तर, अंतराळातील हा आकार 33 प्रकाश वर्षांच्या प्रदेशात पसरला आहे.