Nirmala Sitaraman Facts: इंदिरा गांधींची बरोबरी करणाऱ्या निर्मला सीतारमण यांचं सासर काँग्रेस समर्थक!
निर्मला सीतारमण यांचा जन्म 18 ऑगस्ट 1959 ला तामिळनाडूतील मदुराई येथे झाला होता. सीतारमण यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते. तर, आई एक गृहिणी.
मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे सितारमण यांचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. तर, अर्थशास्त्रामध्ये त्यांन BA पर्यंतच पदवी शिक्षण घेतलं. 1984 मध्ये त्यांनी (JNU) जेएनयुमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. तिथंच त्यांची Parakala Prabhakar यांच्याशी भेट झाली आणि 1986 मध्ये विवाहबंधनात अजकल्यानंतर त्या लंडनला गेल्या.
लंडनला त्यांनी प्राईज वेअरहाऊसमध्ये सिनियर मॅनेजर ऑफ रिसर्च म्हणून काम पाहिलं. कामाप्रतीच्या समर्पकतेमुळं त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
1991 मध्ये सीतारमण भारतात परतल्या आणि त्यांनी 2004 मध्ये भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरीही सीतारमण यांच्या सासरचे मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं म्हटलं जातं.
पुढं सीतारमण यांनी पक्षाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी स्वीकारत पाहता पाहता त्या पक्षाचा चेहरा आणि ओळखही झाल्या. अनेक वादविवादपर कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी झाल्या आणि भाजपची बाजू मांडताना दिसल्या.
देशाच्या संरक्षणमंत्रीपदी येणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. त्यांच्यापूर्वी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही ही जबाबदारी सांभाळली होती.
देशाच्या संरक्षणमंत्रीपदी येणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या. त्यांच्यापूर्वी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही ही जबाबदारी सांभाळली होती.