चालताना मोबाईलवर टायपिंग करणाऱ्यांसंदर्भात नुकताच एक अहवाल समोर आला आहे. जाणून घ्या त्याचसंदर्भात...
तुम्ही सुद्धा चालता चालता फोनवर टायपिंग म्हणजेच टेक्सटिंग करता का? जर तुम्हाला ही अशी सवय असेल तर वेळीच सावध व्हा.
मोबाईलवर टाइप करत चालणाऱ्यांसंदर्भात नुकताच एक अभ्यास करण्यात आला. या अभ्यासामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या संशोधनानुसार चालताना टायपिंग करणाऱ्यांचं शारीरिक संतुलन बिघडण्याची शक्यता अधिक असते.
अशी लोक चालता चालता अचानक पडतात. अनेकदा कोणत्याही गोष्टीला न अडखळता निव्वल संतुलन गेल्याने असे लोक पडतात.
या संशोधनामध्ये सहभागी झालेल्या तरुण-तरुणींना चालता चालता 'The Quick Brown Fox Jumps Over The Lazy Frog' हे वाक्य टाइप करण्यास सांगितलं होतं.
हा शब्द टाइप करत चालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपैकी अनेकजण अडखळून पडण्याची शक्यता वाढल्याचं संशोधकांना दिसून आलं. या अभ्यासात 50 जण सहभागी झालेले.
चालत चालत टायपिंग करताना शरीराची स्थिरता फार कमी असते. एकाच वेळी दोन गोष्टी सुरु असल्याने मेंदूला दोन्हीकडे एकाचवेळी लक्ष ठेवता येत नाही.
मोबाईलवर टायपिंग करत चालताना शरीराचं संतुलन बिघडतं असा दावा करणारं हे संधोधन हेलियॉन जर्नलमध्ये छापून आलं आहे. अशा दुर्घटनांमध्ये गंभीर इजा होण्याची शक्यताही असते.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.